बॅडमिंटन स्पर्धा: स्वान्सचा धुव्वा उडवीत किंगफिशरची उपान्त्य फेरीत धडक

सहावी पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धा

पुणे:किंगफिशर संघाने स्वान्स संघाचा एकतर्फी पराभव करताना सहाव्या पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत उपान्त्य फेरीत प्रवेश केला. पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

पीवायसी हिंदू जिमखाना येथील बॅडमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेतील गटसाखळी फेरीत किंगफिशर संघाने स्वान्स संघाचा 5-2 असा पराभव करताना उपान्त्य फेरीत धडक मारली. तन्मय चोभे, मिहिर विंझे, करण पाटील, गायत्री गर्तक, अद्वैत जोशी, संतोष पाटील, अभिषेक ताम्हाणे व अनया तुळपुळे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करताना किंगफिशर संघाला विजय मिळवून दिला.
आजच्या अन्य साखळी लढतींमध्ये कॉमेट्‌स संघाने स्पुटनिक्‍सवर 4-3 असा रोमांचकारी विजय मिळविला. सुधांशू मेडशीकर व पराग चोपडा, तसेच हर्षवर्धन आपटे व विनित रुकारी यांनी कॉमेट्‌सच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तर बलाढ्य हॉक्‍स संघाने रावेन्सचा 5-2 असा दणदणीत पराभव करताना उपान्त्य फेरीसाठी आपले आव्हान कायम राखले. सुमेध शहा व दीपा खरे, तसेच अश्विन शहा व अमर श्रॉफ यांनी हॉक्‍सच्या विजयात महत्त्वाची कामगिरी बजावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)