बॅडमिंटन स्पर्धा: ब्लॅक हॉक्‍स संघाला नमवून ईगल्स संघाला विजेतेपद

सहावी पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धापुणे: ईगल्स संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवताना ब्लॅक हॉक्‍स संघाचा 4-3 असा पराभव करून पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित सहाव्या पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत विजेतेपद संपादन केले.

पीवायसी हिंदू जिमखाना येथील बॅडमिंटन कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेतील अंतिम फेरीच्या लढतीत चुरशीच्या झालेल्या सामन्यात गोल्ड खुल्या दुहेरी गटात ईगल्सच्या अमित देवधर व अंकित दामले यांनी हॉक्‍सच्या बिपीन देव व हर्षद बर्वे यांचा 21-9, 21-9असा पराभव करून संघाला विजयी सुरुवात करून दिली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात हॉक्‍सच्या शैलेश बोथरा यांनी ईगल्सच्या रवी कासट व शिव जावडेकर यांना पुढे चाल दिली.
गोल्ड खुला दुहेरी गटात ईगल्सच्या मिहीर केळकर व तुषार नगरकर या जोडीने हॉक्‍सच्या आलोक तेलंग व सुरेश वाघेला यांचा 21-16, 21-17 असा तर, सिल्व्हर खुला दुहेरी गटात ईगल्सच्या अनिश राणे व सारंग आठवले यांनी हॉक्‍सच्या अश्विन शहा व अमर श्रॉफ या जोडीचा 21-16, 21-18 असा पराभव करून 4-0 अशी आघाडी मिळवून दिली. अखेर गोल्ड मिश्र दुहेरी गटात ईगल्सच्या मिहीर पाळंदे व ईशा साठे यांना हॉक्‍सच्या सुमेध शहा व दीपा खरे यांनी 17-21, 15-21 असे नमविले.
तसेच सिल्व्हर मिश्र दुहेरी गटात ईगल्सच्या गिरीश मुजुमदार व गौरी कुलकर्णी या जोडीला हॉक्‍सच्या आकाश सूर्यवंशी व राजश्री भावे यांनी 10-15, 13-15 असे पराभूत केले. 49 वर्षांवरील गटात ईगल्सच्या राजेंद्र नखारे व विनायक करमरकर यांना हॉक्‍सच्या हेमंत पाळंदे व हरीश गलानी यांनी 11-21, 20-21असे पराभूत केले. पण सामन्यात आघाडीवर असलेल्या ईगल्स संघाने ब्लॅक हॉक्‍सवर 4-3 अशा फरकाने विजय मिळवताना विजेतेपदाची निश्‍चिती केली.
स्पर्धेतील विजेत्या ईगल्स संघाला करंडक व 30 हजार रुपये, तर उपविजेत्या ब्लॅक हॉक्‍स संघाला करंडक व 20 हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण ट्रूस्पेसचे आश्विन त्रिमल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कुमार ताम्हाणे, शशांक हळबे, आनंद परांजपे, अविनाश जाधव, विवेक सराफ व उदय साने आदी मान्यवर उपस्थित होते.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)