बॅडमिंटन स्पर्धा: ईगल्स, रायझिंग रावेन्स संघांची विजयी सलामी

सहावी पीवायसी-ट्‍र्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धा

पुणे: ईगल्स, रायझिंग रावेन्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून सहाव्या पीवायसी-ट्‍र्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत उद्‌घाटनाचा दिवस गाजवला. पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पीवायसी हिंदू जिमखाना येथील बॅडमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत गटसाखळी फेरीत ब गटात ईगल्स संघाने ब्लॅक हॉक्‍स्‌ संघाचा 5-2असा पराभव करून शानदार सुरूवात केली. सामन्यात गोल्ड खुल्या दुहेरीत ईगल्सच्या अमित देवधर व सारंग आठवले यांनी ब्लॅक हॉक्‍स्‌च्या आश्विन शहा व सुरेश वाघेला यांचा 21-11, 21-14 असा तर, सिल्व्हर खुल्या दुहेरीत ईगल्सच्या तुषार नगरकर व गिरीश मुजुमदार यांनी ब्लॅक हॉक्‍स्‌च्या अमर श्रॉफ व संदीप तपस्वी यांचा 21-17, 20-21, 3-3 असा पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली.

गोल्ड खुल्या दुहेरीत ईगल्सच्या अंकित दामले व अनिश राणे या जोडीने हर्षद बर्वे व बिपीन देव यांचा 21-18, 21-15असा पराभव केला. त्यानंतर ईगल्सच्या विनायक करमरकर व गौरी कुलकर्णी यांना ब्लॅक हॉक्‍स्‌च्या आनंद घाट व सचिन काळे यांनी 10-15, 09-15असे पराभुत करून ही आघाडी कमी केली. गोल्ड मिश्र दुहेरीत मिहिर पालांदेने ईशा साठेच्या साथीत ब्लॅक हॉक्‍स्‌च्या सुमेध शहा व दीपा खरे यांचा 16-21, 21-16, 11-7 असा संघर्षपूर्ण पराभव केला.

सिल्व्हर मिश्र दुहेरीत ईगल्स्‌च्या रवी कासट व शमिका एरंडे या जोडीला ब्लॅक हॉक्‍स्‌च्या आकाश सूर्यवंशी व राजश्री भावे यांनी 02-15, 05-15 असे पराभूत केले. प्रौढ गटात ईगल्स्‌च्या राजेंद्र नखरे व रवी बापट या जोडीने ब्लॅक हॉक्‍स्‌च्या हेमंत पाळंदे व हर्वेश गलाणी यांचा 17-21, 21-20, 11-09 असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला. दुसऱ्या सामन्यात क गटात रायझिंग रावेन्स संघाने फाल्कन संघाचा 4-3असा संघर्षपुर्ण पराभव करून शानदार सुरूवात केली. विजयी संघाकडून अनिकेत शिंदे, तन्मय आगाशे, श्रीयश वर्तक, केदार नाडगोंडे, आयुश गुप्ता, केदार देशपांडे, वेदांत खटोड, प्रांजली नाडगोंडे यांनी अफलातून कामगिरी केली.

स्पर्धेचे उद्‌घाटन ट्रूस्पेस्‌चे उल्हास त्रिमल, आश्विन त्रिमल आणि पीवायसी हिंदू जिमखान्याचे मानद सचिव कुमार ताम्हाणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीवायसी हिंदू जिमखानाचे मानद सचिव कुमार ताम्हाणे, क्‍लबच्या बॅडमिंटन विभागाचे सचिव शशांक हळबे, गिरीश करंबेळकर, पीबीएलचे आयुक्त विवेक सराफ, उदय साने, मुख्य रेफ्री उदय साने, कपिल खरे आदी मान्यवर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)