बॅडमिंटन स्पर्धा : अर्णव, सोहम, समर्थची विजयी आगेकूच 

महाराष्ट्रीय मंडळ हौशी खेळाडूंसाठी बॅडमिंटन स्पर्धा 

पुणे – अर्णव शाह, सोहम जाधव, समर्थ साठे यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून येथे सुरू असलेल्या महाराष्ट्रीय मंडळातर्फे आयोजित हौशी खेळाडूंसाठीच्या बॅडमिंटन स्पर्धेतील 15 वर्षांखालील मुलांच्या गटात तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जोशीज बॅडमिंटन क्‍लब, देवधर बॅडमिंटन अकॅडमी व पुणे जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या मान्यतेने ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील 15 वर्षांखालील मुलांच्या दुसऱ्या फेरीत अर्णव शाहने आर्यन दरकवर 15-3, 15-3 अशी, तर सोहम जाधवने वैष्णव घोलेवर 15-12, 15-10 अशी मात केली.

समर्थ साठेने रेबंटा शर्मावर 15-13, 16-18, 15-9 अशी संघर्षपूर्ण मात करून आगेकूच केली. तर, स्पर्धेतील 11 वर्षांखालील मुलींच्या गटातील सलामीच्या लढतीत सई शिंगणापूरकरने लास्या दिग्रजकरवर 15-5, 15-5 अशी, तर सायली अलोनीने नाविकावर 15-6, 15-11 अशी आणि शुभ्राने पूर्वा मुंडळेवर 15-11, 15-13 अशी मात केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)