फुझोहू ओपन बॅडमिंटन स्पर्धा : सिंधू ,श्रीकांतचे आव्हान संपुष्टात

फुझोहू (चीन) – येथे सुरु असलेल्या चायना ओपन वर्ल्ड टूर सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपान्त्यपूर्व फेरीतील महिलांच्या सामन्यात भारताची स्टार खेळाडू पी.व्ही.सिंधूचे आव्हान चीनच्या हे बिंगजाओने संपुष्टात आणले आहे. तर, पुरुष गटात चायनिझ तैपेईच्या चोऊ तियेन चेनने भारताचा अव्वल खेळ्डू किदंबी श्रीकांतचे आव्हान एकतर्फी परतावून लावताना स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत प्रवेश मिळवला आहे.

फुझोहू ओपनमध्ये भारतीय संघाची अव्वल खेळाडू आणि ऑलिम्पिक स्पर्धेची रौप्यपदक विजेती खेळाडू पी.व्ही.सिंधूकडून भारतीय संघाला पदकाची आशा होती. सिंधूला या स्पर्धेत तिसरे मानांकन प्राप्त होते. तसेच चालू वर्षात महत्वाच्या स्पर्धांमधून ति रिकाम्या हाताने परतली होती त्यामुळे या स्पर्धेत पदक पटकावून अगामी ऑलिम्पिकच्या दृष्टीने ही स्पर्धा तिच्यासाठी महत्वाची मानली जात होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र, फुझोहू ओपनच्या उपान्त्यपूर्व फेरीच्य सामन्यात तिसऱ्या मानांकीत सिंधूचा आठवे मानांकन असलेल्या चीनच्या आठव्या मानांकीत हे बिंगजिआओने 21-17, 17-21, 21-15 असा संघर्षपूर्ण पराभव करत उपान्त्यफेरीत प्रवेश केला आहे. सिंधूचा बिंगजिओ विरोधात वर्षातील तिसरा पराभव आहे. तिने सिंधूला यापुर्वी, इंडोनेशिया ओपन, फ्रेंच ओपन मध्ये पराभूत केले होते. त्याचीच पुनरावृत्ती तिने आज पुन्हा केली.

यावेळी सामन्याच्या सुरुवातीपासूनच बिंगजिओने सिंधूवर मात केलेली होती. पहिल्या सेट मध्ये तिने चांगली सर्व्हिस करत सिंधूला कोर्टच्या चोहु बाजुने पळवताना चांगलेच थकवले. त्यामुळे सिंधूला अपेक्षित खेळ करता आला नाही. यावेळी सिंधूनेही चांगले फटके मारताना पुनरागमनाचा प्रयत्न केला. मात्र, बिंगजिओने तिला प्रतिकाराची जास्त संधी न देता पहिला सेट 21-17 अश्‍या फरकाने आपल्या नावे केला.

मात्र, दुसऱ्या सेट मध्ये सिंधूने जोरदार पुनरागमन करताना बिंगजिओवर प्रतिआक्रमण केले. सिंधूच्या आक्रमक पनाचा तिला दुसऱ्यासेट मध्ये फायदा झाला. यावेळी सिंधूने जाळे जवल जाऊन सुरेख फटके मारत बिंगजिओला चकीत केले. त्यामुळे बिंगजिओ दुसऱ्यासेट मध्ये काहिशी पिछाडी वर गेली होती. सिंधूने तिच्यावर पडलेल्या दबावाचा फायदा उचलताना दुसरा सेट 21-17 अश्‍या गुणांनी आपल्या नावे करत सामन्यात पुनरागमन केले.

तर, तिसऱ्या सेट मध्ये सिंधूने सुरुवातीलाच दबावात खेळ केला त्याचा फायदा उचलताना बिंगजिओने 11-6 अशी आघाडी मिळवत सिंधूवरिल दबाव आणखिनच वाढवला. त्यामुळे दबावात आलेल्या सिंधूकडून चुका झाल्या. मात्र, सिंधूने आपल्या चुका टाळताना पुन्हा एकदा यशस्वी पुनरागमन करताना 15-16 असा गुण फरक आणला. मात्र, बिंगजिओने पुन्हा एकदा आक्रमक खेळ करत तिसरी सेट 21-15 अश्‍या फरकाने सेट सह सामना आपल्या नावे करत उपान्त्यफेरीत धडक मारली.

तर, दुसरीकडे पुरुष उपान्त्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताचा अव्वल खेळाडू किदंबी श्रीकांतचा चोऊ तियेन चेनने 21-14, 21-14 असा सहज आणि एकतर्फी पराभव करताना स्पर्धेच्या उपान्त्यफेरीत प्रवेश केला आहे. यावेळी श्रीकांतला सामन्यातील अती घाई नडली. त्यामुळे सामन्याच्या सुरुवातीलाच श्रीकांतने 10-8 अशी आघाडी घेतली होती. मात्र, त्यानंतर चेनने स्मॅशच्या फटक्‍यांचा सुरेख वापर करत श्रीकांतला चकवले. त्यामुळे आघाडी घेतलेल्या श्रीकांतला त्यानंतर केवल 4 गुण मिळवता आले. तर, चेनने पिछाडीवरुन 13 गुणांची कमाई करताना पहिला सेट आपल्या नावे केला.

तर, दुसऱ्या सेट मध्ये श्रीकांत पुन्हा दबावात खेळताना दिसला. त्यामुळे सेतच्या सुरुवातीलाच तो 10-4 अश्‍या पिछाडीवर पडला होता. मात्र, पुन्हा प्रतिकार करताना त्याने हा फरक 10-7 अश्‍या गुण संख्येपर्यंत आणला. मात्र, पुढे येऊन चेनवर दबाव आणन्याच्या नादात केलेल्या चुकीमुळे चेनने पुन्हा सामन्यात पुनरागमन करत हा फरक 11-7 अश्‍या गुण संख्येवर आणला. त्यानंतर चेनने स्मॅश फटक्‍यांचा वापर करताना श्रीकांतवर दबाव चढवताना आपली आघाडी 18-11 अश्‍या फरकावर आणली. तर, दुसरा गेमही 21-14 असा आपल्या नावे केला.

तत्पूर्वी, गुरुवारी झालेल्या दुसऱ्या फेरीतील सामन्यांमध्ये सिंधूने थायलंडच्या बुसानन आँगबामरुंगफान हीचा 36 मिनिटे चाललेल्या सामन्यात 21-12, 21-15 असा सहज पराभव करताना उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली होती. तर, तीन गेम आणि 44 मिनिटांपर्यंत चाललेल्या चुरशीच्या सामन्यात श्रीकांतने इंडोनेशियाच्या टॉमी सुगियार्तोचा 10-21, 21-9, 21-9 असा पराभव केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)