पारुपल्ली कश्‍यपचा अग्रमानांकीत ‘जेन हा ओ’ला धक्‍का

हॉंगकॉंग ओपन बॅडमिंटन स्पर्धा 2018 : सात्विक-पोनप्पा जोडीजी विजयी आगेकूच

कोवलून (हॉंगकॉंग) – राष्ट्रकूल स्पर्धेचा माजी विजेता पारुपल्ली कश्‍यपने आपल्या पहिल्याच सामन्यात स्पर्धेतील चाइनीज तैपेइच्या अग्रमानांकित ‘सु जेन हाओ’चा संघर्षपूर्ण पराभाव करताना विजयी आगेकूच नोंदवली आहे. तर, मिश्र दुहेरीतील पहिल्या फेरीतील सामन्यात ‘सात्विकसाईराज रॅंकिरेड्डी’ आणि ‘अश्‍विनी पोनप्पाया’ जोडीने चाईनिज तैपेइच्या वांग चॅन लिन आणि लि चिआ हिसीनचा पराभव करत विजयी आगेकूच नोंदवली.

यावेळी पुरुष एकेरीच्या सामन्यात पारुपल्ली कश्‍यपने पहिल्याच दिवशी स्पर्धेतील अग्रमानांकीत खेळाडू सु जेन हाओचा एकतास तीन मिनिते चाललेल्या सामन्यात पराभव करताना विजयी आगेकूच नोम्दवली आहे. यावेळी सामन्याच्या सुरुवातीलाच कश्‍यपने हाओवर दबाव टाकला त्यामुळे त्याने आपला पहिला सेट 21-7 असा सहज जिंकला.

या सेट मध्ये कश्‍यपने जाळीच्या जवळ येत हाओला चांगलेच नाचवले त्यामुळे पहिल्याच सेट नंतर हाओ थकल्यासारखा दिसत होता. तर दुसऱ्या सेट मध्ये हाओने वेगळी रणनिती आखत दुसऱ्या सेट मध्ये पुनरागमन करत कश्‍यपवर प्रतिआक्रमण केले. त्याचा फायदा हाओला झाला आणि त्याने दुसरा सेट 12-21 अश्‍या फरकाने आपल्या नावे केला. मात्र, कश्‍यपने दुसऱ्या सेट मध्ये झालेल्या आपल्या चुकांची पुनरावृत्ती टाळताना तिसऱ्या सेत मध्ये आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले आणि तिसरा सेट 21-18 अश्‍या फरकाने आपल्या नावे करत सामना जिंकला.

तर, मिश्र दुहेरीच्या सामन्यात भारताच्या सात्विकसाईराज रॅंकीरेड्डी आणि अश्‍विनी पोनप्पाया जोडीने चाईनिज तैपेइच्या वॅंग ची लिन आणि ली चीआ हासीनयांचा 21-16, 19-21, 21-14 असा पराभव करत स्पर्धेचा पहिला दिवस गाजवला. यावेळी पहिल्या सेट सहज जिंकल्यानंतर दुसरा सेट त्यांना थोडक्‍यात गमवावा लागला. मात्र, तिसऱ्या सेट मध्ये पुन्हा पुनरागमन करत त्यांनी सामना आपल्या नावे केला.

पुरुष एकेरी गटात आता भारताच्या किदांबी श्रीकांतचा सामना हॉंगकॉंगच्या की विन्सेटशी होईल. या सामन्यात विजय मिळवल्यास त्याची गाठ दुसऱ्या फेरीत भारताच्या एच. एस. प्रणॉयशी होऊ शकते. प्रणॉय स्पर्धेची सुरुवात डेन्मार्कचा आंद्रेस अँटोनसेनविरुद्ध करेल. या हंगामात स्विस ओपन व हैदराबाद ओपन स्पर्धेचे जेतेपद मिळवणारा समीर वर्माचा सामना थायलंडच्या सुपान्यू अविहिंगसॅनोनशी होईल, तर बी साई प्रणीथ थाई खेळाडू खोसित फेटप्रदाबचा सामना करेल.

पुरुषांच्या दुहेरीत सात्विकसाईराज रनकीरेड्डी यांनी फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला होता. त्यांचा सामना जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या व लंडन ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता डेन्मार्कच्या माथिआस बोए व कार्स्टन मोगेनसेन जोडीशी होणार आहे, तर मनु अत्री व बी सुमिथ रेड्डी जोडीचा सामना थायलंडच्या बोदीन इसारा व मानीपोंग जोंगजितशी होईल. महिला दुहेरीत अश्‍विनी पोणप्पा व एन सिकी रेड्डीसमोर पहिल्या फेरीत जपानच्या मिसाकी मात्सुटोमो व अयाका ताकाहाशी यांच्याशी सामना होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)