सस्मितचा तिसऱ्या मानांकित पार्थला धक्का

अमनोरा करंडक बॅडमिंटन स्पर्धा

पुणे – सस्मित पाटील याने तिसऱ्या मानांकित पार्थचा पराभव करताना येथे सुरू असलेल्या पीवायसी आणि हवेली तालुका बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने आयोजित अमनोरा कप बॅडमिंटन स्पर्धेतील 19 वर्षांखालील मुलांच्या गटात आगेकूच नोंदवली. सस्मितने तिसऱ्या मानांकित पार्थ देशपांडेला पराभवाचा धक्का दिला. सस्मितसह अग्रमानांकित सोहम नवंदर, दुसऱ्या मानांकित प्रतीक धर्माधिकारी, चौथ्या मानांकित आयुष खांडेकर यांनी आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करून स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील प्रवेश निश्‍चित केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पीवायसी येथील बॅडमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेतील 19 वर्षांखालील मुलांच्या उपांत्यपूर्व फेरीत बिगरमानांकित सस्मित पाटीलने पार्थ देशपांडेचे आव्हान 21-17, 11-21, 21-14 असे परतवून लावले. सस्मितची उपांत्य फेरीत सोहमशी लढत होईल. सोहमने सोहम कुलकर्णीवर 21-16, 21-11 अशी मात केली. दुसरी उपांत्य लढत आयुष आणि प्रतीक यांच्यात रंगणार आहे. उपांत्यपूर्व फेरीत आयुषने सारंग आठवलेवर 21-17, 21-5 असा, तर प्रतीकने तेजस चितळेवर 21-8, 21-14 असा विजय मिळवला.

निकाल : 11 वर्षांखालील मुली : उपांत्यपूर्व फेरी – स्वामिनी तिकोणे वि. वि. जुई जाधव 21-14, 21-17; सुखदा लोकापुरे वि. वि. जुई हळणकर 21-15, 21-6; इकिशा मेदाने वि. वि. अग्नी ठाकूर 21-10, 21-1; प्रांजल सातपुते वि. वि. युतिका चव्हाण 21-19, 14-21, 22-20. मुले : सार्थक पाटणकर वि. वि. कोणार्क इंचेकर 14-21, 21-10, 21-10; वरुण गंगवार वि. वि. सुदीप खोराटे 21-19, 26-24; अजिंक्‍य कुलकर्णी वि. वि. केविन पटेल 21-17, 16-21, 21-19; अवधूत कदम वि. वि. आर्यन बागल 21-9, 21-19.

13 वर्षांखालील मुली : उपांत्यपूर्व फेरी – आंचल जैन वि. वि. श्रीया उत्पट 21-11, 21-15; संजना अंबेकर वि. वि. रिया भालेराव 21-11, 21-10.

19 वर्षांखालील मुली : उपांत्यपूर्व फेरी – नव्या वि. वि. स्वराली चिटणीस 14-21, 21-13, 21-18; रिया हब्बू वि. वि. गौरी कुलकर्णी 21-4, 10-21, 21-13; ज्ञानेश्वरी फाळके वि. वि. सारिका गोखले 21-17, 21-14; सारा नव्हरे वि. वि. ऋतुजा निर्गुण 21-16, 18-21, 21-11.

15 वर्षांखालील मुली : उपांत्यपूर्व फेरी – रिद्धी पुडके वि. वि. नेहल प्रभुणे 21-5, 21-10; सानिका पाटणकर वि. वि. साद धर्माधिकारी 21-16, 21-12; सायली फाटक वि. वि. वेदिका दिवाण 21-13, 21-12; अनन्या गाडगीळ वि. वि. संजना अंबेकर 21-10, 21-14;

मुले : ध्रुव ठाकोरे वि. वि. सौम्यरूप पोद्दार 21-16, 21-11; प्रथम वाणी वि. वि. रोनक गुप्ता 21-11, 21-10; सुवीर प्रधान वि. वि. आदित्य लोगनाथन 19-21, 21-13, 21-13; वर्धन डोंगरे वि. वि. श्री लांडे 21-6, 21-13.

पुरुष एकेरी : उपांत्यपूर्व फेरी – नरेंद्र पाटील वि. वि. जयराज शकतावत 21-18, 21-15; वसीम शेख वि. वि. अभिषेक बोराटे 21-11, 21-16; विनित कांबळे वि. वि. कुणाल वाघमारे 21-16, 21-13; साहिल लोखंडे वि. वि. सोहम नवंदर 21-9, 22-20.

महिला एकेरी : उपांत्यपूर्व फेरी – आदिती काळे वि. वि. रिया जाईल 21-16, 21-17; रिया पवार वि. वि. राधिनी भामरे 21-10, 21-16; कल्याणी लिमये वि. वि. योगिता साळवे 21-10, 21-10; स्वराली चिटणीस वि. वि. स्वप्ना बेलसरे 21-16, 21-7.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)