संपूर्ण ओबीसी समाज आढळरावांच्या पाठीशी

संग्रहित छायाचित्र

आमदार योगेश टिळेकर : हडपसर येथे भव्य मेळावा : दोन हजार दुचाकींची रॅली

हडपसर – छगन भुजबळ सोडल्यास कुठल्याच ओबीसी नेतृत्वाला राजकारणात मोठं होण्याची संधी राष्ट्रवादीने दिली नाही. माळी समाजाचे असल्यानेच खेडमधून सुरेश गोरेंना 2014 मध्ये राष्ट्रवादीने तिकीट नाकारले. शेवटी शिवसेनेने न्याय दिला. भाजपने सात ओबीसी नेत्यांना आमदार केले, शिवसेनेचे बहुतांश आमदार ओबीसी समाजाचे आहेत. तेव्हा उगाच ओबीसींचा कळवळा दाखवणाऱ्या राष्ट्रवादीने एक गोष्ट लक्षात घ्यावी, शिरुर मतदारसंघातील संपूर्ण ओबीसी समाज खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या पाठीशी भक्‍कमपणे उभा असून विक्रमी मताधिक्‍याने विजयी करून त्यांना मंत्रीही करणार असल्याचे आमदार योगेश टिळेकर यांनी सांगितले.

आमदार योगेश टिळेकर व सुरेश गोरे यांच्या पुढाकाराने शिरूर लोकसभा मतदार संघातील संपूर्ण ओबीसींचा भव्य मेळावा हडपसर येथे पार पडला. संध्याकाळी दोन हजार दुचाकींच्या भव्य रॅलीनंतर झालेल्या या मेळाव्यात मोठ्या संख्येने खेड, जुन्नर, भोसरी, हडपसर, आंबेगाव व शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघातून ओबीसी माळी समाजाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. टिळेकर म्हणाले, राष्ट्रवादी हाच खरा जातीयवादी पक्ष आहे. ओबीसींच्या बाबतीत तर कॉंग्रेसपेक्षाही वाईट आहे. कारण कॉंग्रेसने बाळासाहेब शिवरकर, नितीन राऊत, दिप्ती चौधरी आदींना संधी दिली. दादा, सुरुवातीला थोडी गडबड झाली होती, पण काही लोकांना समजून सांगावं लागलं, आज वातावरण बदललं आहे. सर्वच्या सर्व लोकं आता शिवसेना-भाजप युतीचं काम करायला लागले आहेत.

संपूर्ण माळी समाज दादांच्या पाठीशी उभा आहे हे सांगायला मी आलो आहे. योगेशअण्णा तुमच्यापेक्षाही जास्त लीड मी खेडमधून देणार आहे असे आमदार सुरेश गोरे यांनी सांगितले. याप्रसंगी भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विकास रासकर यांनी तीव्र भाषेत आपल्या भावना व्यक्‍त केल्या. कार्यक्रमाला भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव राजू केकाण, शिवसेना ओबीसी आघाडीचे नेते के. टी. आरू, उद्योजक अक्षय आढळराव, नगरसेविका लता धायकर, उज्ज्वला जंगले, जि.प. सदस्या वंदना कोद्रे व भाजपा-शिवसेना युतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

सन 2014 मध्ये राष्ट्रवादीने खेडमधून सुरेश गोरे यांच्यावर केवळ ओबीसी समाजाचे म्हणून अन्याय केला. मात्र, शिवसेनेने त्यांना साथ देत त्यांना विधानसभेत पाठविले. कामांचा विचार केला तर राष्ट्रवादीच्या कुठल्याही खासदाराला माझे आव्हान आहे की त्यांनी केलेल्या कामांची आणि माझ्या कामांची तुलना करा, खरे-खोटे स्पष्ट होईल. मागील पाच वर्षांत सुमारे 14 हजार कोटींची कामे केली.

– शिवजीराव आढळराव पाटील, खासदार, शिरूर लोकसभा मतदारसंघ

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)