विमानतळ बंदचा आदेश मागे

नवी दिल्ली – सीमेवरील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर उत्तर भारतातातील नऊ विमानतळ सार्वजनिक विमान वाहतुकीला बंद करण्याचा आदेश आज सकाळी देण्यात आला होता पण नंतर तो मागे घेण्यात आला आहे. जम्मू काश्‍मीर, पंजाब आणि हिमाचल प्रदेशातील हे नऊ विमानतळ बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला होता पण नंतर तो लगेच मागे घेण्यात आला असून त्यातील काही विमानतळांवरून नियमीत विमान वाहतुक सुरूही झाली असल्याचे वृत्त आहे.

पाकिस्तानच्या विमानांनी भारतीय हवाई हद्दीचा भंग केल्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून हा आदेश जारी करण्यात आला होता. भारत सरकारने दिलेल्या सुचनेनुसार अनेक विमान कंपन्यांनी आपल्या प्रवाशांना आपली विमान सेवा काहीं काळासाठी खंडीत करण्यात येत असल्याच्या सुचना आपल्या प्रवाशांना दिल्या आहेत. दिल्लीच्या हवाई वाहतूक नियंत्रण कक्षातून या सुचना सर्व विमान कंपन्यांना देण्यात आल्या होत्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)