ICC T20 Rankings : पाकिस्तानचा ‘बाबर आझम’ अव्वल स्थानी

क्रमवारीत पाकिस्तान संघही प्रथमस्थानी कायम

दुबई – आयसीसीने सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट टी-20 ची  क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत  सलग तिसऱ्यांदा यावर्षीही पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम याने अव्वलस्थान पटकाविले आहे. तर पाकिस्तानचा संघानेसुध्दा क्रमवारीत पहिले स्थान प्राप्त केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आॅस्ट्रेलिया विरुध्द  नुकत्याच पार पडलेल्या तीन टी-20 क्रिकेट सामन्याच्या मालिकेत आझम याने दोन अर्धशतक लगावले होते. तसेच पाकिस्तान संघाने ही मालिका 3-0 ने जिंकल्याने पाकिस्तान संघ टी-20 क्रिकेट क्रमवारीत अव्वलस्थानी कायम आहे. न्यूझीलंडविरूध्द तसेच भारत आणि वेस्टइंडिज यांच्यात होणाऱ्या टी-20 मालिकेमुळे पाकिस्तानच्या अव्वलस्थानाला धोका पोहचणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)