गावठी पिस्तूल पुरविणाऱ्या बाबा केदारला खंडपीठाचा जामीन

केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरण

नगर – केडगाव दुहेरी हत्याकांडात आरोपींना गावठी पिस्तूल पुरविणाऱ्या बाबा केदारला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे. महानगरपालिकेच्या पोटनिवडणूक निकालानंतर 7 एप्रिल 2018 रोजी सायंकाळी सहा वाजता केडगाव येथे शिवसेना उपशहरप्रमुख संजय कोतकर व शिवसैनिक वसंत ठुबे या दोघां शिवसैनिकांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

हत्येनंतर गोळीबार करणारा आरोपी संदीप गुंजाळ पोलिसांत स्वत:हून हजर झाला होता. त्यानंतर पोलिसांनी गुंजाळ याच्या अन्य साथीदारांना अटक केली होती. आरोपींना गावठी पिस्तूल पुरविणारा बाबा केदार यास पोलिसांनी निमगाव येथून दि.11 एप्रिल रोजी अटक केली होती. केडगाव शिवसैनिक हत्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात 30 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.दरम्यान, जामिनासाठी बाबा केदारने औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल केला होता. केदारच्यावतीने ऍड. प्रकाश परांजपे यांनी काम पाहिले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here