शिक्षणमंत्र्यांना दाखविणार काळे झेंडे

नगर-बी.पी.एड, ए.टी.डी./ए.एम. शिक्षक भरतीतून व संच मान्यतेतून हद्दपार करण्याच्या धोरणाचा क्रीडा शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यलयासमोर निदर्शने करून निषेध करताना महासंघाचे राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर व इतर.

कला-क्रीडा शिक्षकांचा इशारा : भरतीतून व संच मान्यतेतून हद्दपार केल्याचा निषेध

नगर – बी.पी.एड, ए.टी.डी./ए.एम. शिक्षक भरतीतून व संच मान्यतेतून वगळल्याने क्रीडा शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यलयासमोर निदर्शने करण्यात आली. सातारा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात शिक्षणमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा देण्यात आला.

या वेळी महासंघाचे राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर, माध्यमिक संघटनेचे सचिव आप्पासाहेब शिंदे, कलाध्यापक संघटनेचे अध्यक्ष अशोक डोळसे, जिल्हा सचिव शिरीष टेकाडे, सुनील दानवे, नंदकुमार शितोळे, बापू होळकर, महेंद्र हिंगे, नाना डोंगरे, मंगेश काळे, भानुदास तमनर, सतीश कर्डिले, संदीप गायकवाड, भारत गोल्हार, बाळासाहेब मुळे, बापूसाहेब जगताप, बाळू बोडखे, नवनाथ साळवे, आर. व्ही. शिदोरे, व्ही. आर. सापा, भाऊसाहेब पवार आदींसह कला-क्रीडा शिक्षक उपस्थित होते.

शिक्षक भरतीत कला व क्रीडा-शिक्षक यापुढे कधीही भरले जाणार नसल्याचे शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केले होते. कला व क्रीडाशिक्षकांना संच मान्यतेत माध्यमिकमधून उच्च प्राथमिक 6 ते 8 ला वर्गीकृत केले. नववी-दहावीला कमी वर्ग असणाऱ्या शाळेत फक्त तीनच बी.एड शिक्षकांना संच मान्यतेत ठेवून उर्वरित बी.एड शिक्षकांनाही 2016 पासून माध्यमिकमधून उच्च प्राथमिकला वर्गीकृत करण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात 40 ते 50 हजार बी.पी.एड, ए.टी. डी./ ए.एम. व बी.एड हे माध्यमिक शिक्षक मोठया प्रमाणावर अतिरिक्त ठरणार असल्याची भीती या शिक्षकांनी व्यक्त केली.

विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासास शारीरिक सुदृढता व कलात्मक बुद्धीला बुद्धीमत्तेची जोड देण्यासाठी बी.पी.एड, ए.टी.डी./ए.एम. तसेच बी.एड शिक्षकांची भरती व्हावी, उच्च प्राथमिक, माध्यमिकमध्ये संच मान्यता दाखविण्यात यावी आदी मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आल्या. या मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, शिक्षणाधिकारी (माध्य) लक्ष्मण पोळे, उपशिक्षणाधिकारी रामदास खेडकर यांना देण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)