अझरला उचलता येत नसेल; तर ते काम आम्ही करू 

अमरिंदर यांनी इम्रान यांना सुनावले

पतियाळा – पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी भारताकडे पुरावे मागितल्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना तीव्र शब्दांत सुनावले आहे. तुम्हाला जैश-ए-महंमदचा प्रमुख मसुद अझर याला उचलता येत नसेल; तर ते काम आम्ही तुमच्यासाठी करू, असे अमरिंदर यांनी म्हटले आहे.

तुमच्या (पाकिस्तानी) भूमीत राहून अझर तुमच्या गुप्तचर संस्थेच्या (आयएसआय) मदतीने दहशतवादी हल्ल्यांचे कट रचतो. जा आणि त्याला उचला. कुठल्या पुराव्यांविषयी तुम्ही बोलत आहात. आम्ही शहिदांचे पार्थिव तुमच्याकडे पाठवायचे का? दर दिवशी नियंत्रण रेषेवर (एलओसी) आमचे जवान शहीद होत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यांना कोण लक्ष्य करते? काश्‍मीरात आणि भारताच्या इतर भागांत पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या कृत्यांची माहिती संपूर्ण जगाला आहे. मुंबईतील महाभयंकर दहशतवादी हल्ल्यांमागे (26/11) पाकिस्तान होता. त्याबाबतचे पुरावे देण्यात आले. त्या हल्ल्यांमागे असणाऱ्यांवर पाकिस्तानने काय कारवाई केली, असा बिनतोड सवाल अमरिंदर यांनी इम्रान यांना उद्देशून ट्‌विटरवरून केला. पाकिस्तानच्या बहावलपूरमध्ये अझर असल्याचेही त्यांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)