लॅंड माफीयांच्या यादीत खासदार आझम खान यांचे नाव

समाजवादी पक्षाने केला निषेध

रामपुर- उत्तरप्रदेशात रामपुरच्या जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील लॅंड माफीयांची एक काळी यादी ऑन लाईन स्वरूपात प्रकाशित केली असून त्या यादीत समाजवादी पक्षाचे खासदार आझमखान यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यावरून समाजवादी पक्षाने जोरदार आक्षेप घेतला असून आझम खान यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

बेकायदेशीररित्या जमीन बळकावल्याच्या प्रकरणात त्यांच्या विरोधात अलिकडेच एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर सरकारने त्यांचे नाव लॅंड माफीयांच्या यादीत घातले आहे. आझम खान यांनी मोहंमद अलि जौहर विद्यापीठासाठी बळजबरीने जमीन ताब्यात घेतल्याचा गुन्हा त्यांच्या विरोधात नोंदवण्यात आला आहे.

स्वता आझम खान हेच या विद्यापीठाचे संस्थापक आणि कुलगुरू आहेत. रामपुर जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारच्या इशाऱ्यावरून त्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप समाजवादी पक्षाने केला आहे. या खोट्या गुन्हांची चौकशी करण्यासाठी समाजवादी पक्षाने 21 जणांची एक समितीही स्थापन केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)