आयुष्मान खुरानाचा ‘बाला’ चित्रपटाची स्टोरी चोरीची ?

बाॅलीवूड अभिनेता आयुष्यमान खुराना याची प्रमुख भूमिका असलेल्या ‘बधाई हो’ सिनेमाने 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला होता. मात्र आयुष्यमानचा एक आगामी चित्रपट ‘बाला’ मात्र कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. सहाय्यक दिग्दर्शक कमल कांत चंद्रा यांनी ‘बाला’ची कथा चोरीची असल्याचा आरोप केला आहे. बाला चित्रपटाची स्टोरी चोरल्याच्या आरोपाखाली आयुष्यमान तसेच ‘बाला’च्या दिग्दर्शक व निर्मात्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले आहे.  ‘बाला’चा लीड अ‍ॅक्टर आयुष्यमान खुराणा, निर्माता दिनेश विजन व दिग्दर्शक अमर कौशिक यांनी माझ्या ‘विग’ या चित्रपटाची कथा चोरल्याचा आरोप कमल कांत यांनी केला आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)