आयुष्यमान खुराणाचा ‘बधाई हो’ 100 कोटींच्या क्लबमध्ये

बाॅलीवूड अभिनेता आयुष्यमान खुराना याची प्रमुख भूमिका असलेल्या ‘बधाई हो’ सिनेमाने 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे.अमित शर्मा दिग्दर्शित ‘बधाई हो’ हा सिनेमा 18 आॅक्टोबरला प्रदर्शित झाला होता. सिनेमात आयुष्यमान खुराणा,सान्या मल्होत्रा, नीना गुप्ता, गजराज राव, शार्दुल राणा, सुरेखा सिकरी, राहुल तिवारी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

‘बधाई हो’ सिनेमाने बाॅक्स आॅफिसवर 100 कोटी रूपयांची कमाई केली आहे. बधाई हो हा सिनेमा 100 कोटीच्या क्लबमध्ये समाविष्ट होणारा या वर्षीचा दहावा सिनेमा ठरला आहे. या वर्षात 100 कोटीची कमाई करणारे पद्मावत, सोन के टीटू की स्वीटी, रेड, बागी 2, राजी, रेस 3, संजू, गोल्ड आणि स्त्री हे सिनेमे आहेत.

चित्रपट व्यापार विश्लेषक ‘तरन आदर्श’ यांच्या अहवालानुसार या चित्रपटाने 17 व्या दिवशीच 100 कोटींचा आकडा पार केला होता. ‘बधाई हो’ याच्या व्यतिरिक्त सोनू के टीटू की स्वीटी, राजी आणि स्त्री  या सिनेमानी 100 कोटी रूपये कमाई करून हे दाखवून दिले आहे की, सिनेमाची चांगली कथा हिच सिनेमाला बाॅक्स आॅफिसवर यश मिळवून देते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)