आयुष शर्माचे ट्‌विटर अकाउंट हॅक 

सलमानचा मेव्हणा आयुष शर्माचा “लव्ह यात्री’ रिलीज झाला, त्याला समाधानकारक प्रतिसादही मिळाला आहे. मात्र आता वेगळ्याच कारणाने आयुष शर्मा चर्चेत आला आहे. आयुष शर्माचे ट्विटर अकाउंट कोणीतरी हॅक केले आहे. या ट्विटर अकाउंटवर अत्यंत घाणेरणे ट्विट पोस्ट व्हायला लागले आहेत. आयुषची पत्नी आणि सलमानची बहिण अर्पिताने स्वतःच्या ट्विट अकाउंटवरून ही माहिती दिली आहे. आयुषचे ट्विटर अकाउंट पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न सायबर एक्‍सपर्ट करत आहेत. हे अकाउंट हॅक करणाऱ्याच्या विरोधात कठोर कारवाईदेखील केली जाईल, असेही अर्पिताने म्हटले आहे.
मात्र जेंव्हा आयुषचे ट्‌विट अकाउंट तपासले, तेंव्हा सर्वकाही ठिकठाक असल्यासारखे दिसत होते. या अकाउंटच्या माध्यमातून पोस्ट करण्यात आलेल्या घाणेरड्या पोस्ट डिलीट करण्यात आल्या असाव्यात. या पोस्टवरून आयुषबाबत खूपच आक्षेपार्ह पोस्ट झाल्या होत्या. त्याच्या व्यक्तिगत चारित्र्याबाबतच्या या पोस्टमुळे अर्पिता खूपच भांबावली होती. या पोस्टमध्ये जसे म्हटले गेले आहे, तसा आयुष अजिबात नाही, असे तिने कळकळीने म्हटले आहे. आयुषच्या आताच सुरू झालेल्या करिअरला ब्रेक लावण्याच्या उद्देशानेच हा खोडसाळपणा कोणीतरी केला असावा. “लव्ह यात्री’चे यश न बघू शकणाऱ्या कोणाचाही यामागे हात असावा.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)