अयोध्या प्रकरण : श्री श्री रविशंकर यांना मध्यस्थ बनविल्याने ओवैसी नाराज 

नवी दिल्ली – अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर निर्मितीबाबतचे प्रकरण आता मध्यस्थांकडे सोपण्यात आले आहे. मध्यस्थीसाठी तीन सदस्यीय समिती नेमली असून यामध्ये न्या.एफ एम खलिफुल्ला, श्री श्री रविशंकर आणि ज्येष्ठ वकील श्रीराम पांचू यांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी श्री श्री रविशंकर यांच्या नावावर नाराजी दर्शवली आहे.

ओवैसी यांनी म्हंटले कि, श्री श्री रविशंकर यांना सुप्रीम कोर्टाने मध्यस्थ बनवले आहे परंतु त्यांचे याआधीचे वादग्रस्त वक्तव्य सर्वांसमोर आहे. त्यामध्ये रविशंकर म्हणत आहेत कि, जर मुसलमानांनी अयोध्यावरून आपला हक्क सोडला नाहीतर भारत सीरिया बनेल. सुप्रीम कोर्टाने तटस्थ व्यक्तीला मध्यस्थ बनवले असते तर चांगले झाले असते. श्री श्री रविशंकर यांना मध्यस्थ बनवलेच आहे तर आता त्यांना तटस्थ राहावे लागणार आहे. श्री श्री आपली जबाबदारी समजतील, अशी आशा आहे, असे ओवैसी म्हंटले आहे.

-Ads-

दरम्यान, अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणात आता मध्यस्थांना घेतले असून या समितीला आपले काम ४ आठवड्यांमध्ये सुरु करायचे आहेआणि आपल्या संपूर्ण कार्याचा अहवाल सादर करायचा आहे.

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)