अयोध्या विवाद त्वरेने निकाली काढावा : योगी आदित्यनाथ 

लखनौ – अयोध्या विवाद त्वरेने निकाली काढण्यात यावा अशी मागणी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. राज्यातील शांती आणि बंधुभाव टिकावा यांसाठी रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमीन विवाद त्वरेने निकाली काढावा असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची सुनावणी जानेवारी पूर्वी होऊ शकणार नाही हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यनंतर आता शक्‍य नसल्याचे त्यांनी बोलून दाखवले.

हा मामला आता सर्वोच्च न्यायालयात असला, तरी शांती व बंधुभाव राखण्यासाठी आणि बहुसंख्य लोकांच्या भावनांचा मान राखण्यासाठी दुसरा एखादा पर्याय शोधण्याच्या आवश्‍यकतेवर त्यांनी भर दिला आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या वकिलाने खटला त्वरेने चालवण्याची सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सर्वोच्च न्यायालयाने राम जन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणची सुनवणी जानेवारी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत स्थगित ठेवल्यानंतर आरएसएस आणि त्याच्या सहयोगी संघटनांनी आता सरकारने राम मंदिर उभारण्यासाठी कायदा काढावा अशी भूमिका घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)