अयोध्या प्रकरण : कोण आहेत तीन सदस्यीस समितीमधील ‘त्या’ व्यक्ती 

नवी दिल्ली – अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर निर्मितीबाबतचे प्रकरण आता मध्यस्थांकडे सोपण्यात आले आहे. मध्यस्थीसाठी तीन सदस्यीय समिती नेमली असून यामध्ये न्या.एफ एम खलिफुल्ला, श्री श्री रविशंकर आणि ज्येष्ठ वकील श्रीराम पांचू यांचा समावेश करण्यात आला आहे. नायाधीश रंजन गोगई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय खंडपीठाने हा निर्णय घेतला.

न्या.एफ एम खलिफुल्ला
सर्वोच्च न्यायालयाचे माजी नायाधीश एफ एम खलिफुल्ला तामिळनाडूचे रहिवासी आहेत. त्यांचे पूर्ण नाव फाकिर मोहम्मद इब्राहिम  खलिफुल्ला आहे. १९७५ मध्ये न्या.एफ एम खलिफुल्ला यांनी वकील म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. २००० साली त्यांची मद्रास उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली. यानंतर २०११ साली जम्मू येथे उच्च न्यायालयमध्ये मुख्य न्यायाधीशपदी न्या.एफ एम खलिफुल्ला विराजमान झाले. २०१२ साली सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश नियुक्त झाल्यानंतर २०१६ मध्ये निवृत्त झाले.

श्री श्री रविशंकर  
श्री श्री रविशंकर अध्यात्मिक धर्मगुरू म्हणून जगभर प्रसिद्ध आहेत. त्यांचे जगभरात लाखो भक्त आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनची श्री श्री रविशंकर यांनी स्थापन केली आहे. या संस्थेच्या १५१ देशांमध्ये शाखा आहेत. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग असणाऱ्या श्री श्री रविशंकर यांनी याआधीही अयोध्या वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी करण्याचा मार्ग सुचवला होता आणि प्रयत्नही केला होता.

ज्येष्ठ वकील श्रीराम पांचू 
श्रीराम पांचू मागील ४० वर्षांपासून ज्येष्ठ वकील म्हणून कार्यरत आहेत. मिडिएशन चेंबर्सचे संस्थापक श्रीराम पांचू यांनी मध्यस्थीद्वारे देशातील अनेक व्यावसायिक, कॉर्पोरेट आणि अन्य क्षेत्रातील मुद्दे सोडविण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे. त्यांची संस्था न्यायालयाच्या बाहेर मुद्दे सोडविण्याचे काम करते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)