अयोध्या प्रकरणाची आता जानेवारीत सुनावणी 

नवी दिल्ली – अयोध्येतील वादग्रस्त जागेवरील मालकीच्या संबंधातील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने आज जानेवारी महिन्यापर्यंत पुढे ढकलली आहे. सरन्यायाधिश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे आज या प्रकरणाची सुनावणी होणार होती तथापी ही सुनावणी येत्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात योग्य त्या खंडपीठापुढे होईल त्या खंडपीठाकडून सुनावणीच्या संबंधातील वेळापत्रक निश्‍चीत केले जाईल असे आजच्या सुनावणीच्यावेळी स्पष्ट करण्यात आले.

अयोध्येतील जागेच्या वादाच्या संबंधात अलहाबाद उच्च न्यायालयाने जागेचे त्रिभाजन करून 2.77 एकर जागा रामलल्ला, सुन्नी वक्‍फ बोर्ड आणि निर्मोही आखाडा या तीन पक्षकारांना समप्रमाणात वाटून देण्याचा निर्णय दिला होता. त्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका बाबरी मशिद कृती समिती आणि अन्य संबंधीत संघटनांनी दाखल केल्या आहेत.अशा एकूण चौदा आव्हान याचिका या अनुषंगाने दाखल करण्यात आल्या आहेत. त्यावरील सुनावणी पाच न्यायाधिशांच्या खंडपीठाकडे सोपवण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका या आधीच फेटाळण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)