एक्‍सलन्सी ऍकॅडमी संघाला विजेतेपद, बीईडी संघावर एकतर्फी मात

सातवी कै. हुसेन हॉकी अजिंक्‍यपद स्पर्धा : शालेय गटांत एसएनबीपी, आलेगावकर विजेते

पुणे: एक्‍सलन्सी ऍकॅडमी संघाने बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप संघाचा 4-1 असा सहज पराभव करताना कै. हुसेन नाबी शेख हॉकी आणि स्पोर्टस्‌ फाऊंडेशनतर्फे आयोजित सातव्या कै. हुसेन हॉकी स्पर्धेत विजेतेपद पटकावले.

मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, नेहरूनगर पिंपरी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत एक्‍सलन्सी ऍकॅडमी संघाने बॉम्बे इंजीनिअरिंग ग्रुपचा 4-1 असा सहज पराभव केला. यामध्ये युवराज वाल्मिकी याने तीन गोल करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. विनीत शेट्टी याने एक गोल केला. बॉम्बे इंजीनिअरिंग ग्रुपकडून कांचन राजभर याने एकमेव गोल केला.

आंतरशालेय गटाच्या 17 वर्षांखालील मुलांच्या गटात एसएनबीपी संघाने लॉयला संघाचा 5-0 असा पराभव करून विजेतेपद मिळवले. सेंट पॅट्रिक हायस्कूलने तिसरा क्रमांक मिळविला. मुलींच्या गटात आलेगांवकर हायस्कूल, खडकी संघाने ऍग्लो उर्दू हायस्कूलचा पराभव करून विजेतेपद मिळवले.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण पुणे विभागाचे धर्मादाय सहआयुक्‍त राहुल चव्हाण, तसेच साईचे पश्‍चिम विभागाचे संचालक वीरेंद्र भांडारकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवडचे एनसीपी युवाचे अध्यक्ष विशाल वाकडकर, अध्यक्ष सनयोग वाघिरे, ऑलिम्पिकपटू विक्रम पिल्ले आणि हॉकी महाराष्ट्रचे उपाध्यक्ष मनीष आनंद उपस्थित होते.

यंदाचे कै. हुसेन पुरस्कार 1) निवृत्ती काळभोर (पुणे- कुस्ती आणि खोखो), 2) संजय कांबळे (पुणे- जलद स्केटिंग) आणि 3) शामसुंदर भालेराव (औरंगाबाद – हॉकी) यांना देण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)