आवाज …

भारत जागतिक महासत्तेकडे वाटचाल करत असला तरी स्त्री सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. दररोज वर्तमानपत्रात छेडछाडीची किंवा बलात्काराचे वृत्त असतेच. आज स्त्री कुठेच सुरक्षित नसते. मुली कुठेही फिरताना अथवा बसमध्ये, कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक एवढेच नव्हे तर घरातही. आज अनेक केसेसमध्ये बलात्कार करणारा आरोपी हा ओळखीमधीलच असतो. अशाच एका विषयावर आधारित “आवाज’ हा लघुपट.

-Ads-

“आवाज’ कथा आहे आरजे आशा, तिचा नवरा आणि तिची मुलगी मीराची. आशा रेडिओच्या शोमध्ये जाण्यासाठी तयार होऊन आपल्या नवऱ्यास मुलगी मीराला उठवण्यास सांगते. व आशा निघून जाते. त्या दिवशी महिला दिनानिमित्त रेडिओवर खास कार्यक्रम असतो. त्या शोचे नाव असते “आवाज’. आरजे आशा रेडिओतून सर्व महिलांना आवाहन करते कि त्यांची कथा रेडिओद्वारा सर्वाना सांगावी. पहिलाच फोन येतो तो एका मुलीचा. मुलगी सुरुवातीलाच नाव न सांगण्याच्या अटीवर आपली कथा सुरु करते.

ती म्हणते, माझे एक छोटेसे जग आहे आई, बाबा आणि मी. रोज दाराची एक घंटी वाजते आणि एक माणूस आत येतो. रात्री 12 वाजता तो माझ्या खोलीत येऊन माझ्यावर अत्याचार करतो. मी घाबरत नाही. फक्त शांत राहते. कारण आम्ही नाती जपत असतो. रडून स्वत:ला शांत करतो आणि झोपून जातो. आपण कुठेच सुरक्षित नसतो. अगदी आपल्या घरातसुध्दा. कोणाचा भाऊ, कोणाचे वडील तर कोणाचे काका. ही माझ्यासारख्या कित्येक मुलीची रोज रात्रीची कथा आहे.

यानंतर ती आरजे आशा दुखी होऊन आपल्या घरी येते. त्यावेळी तिच्या मुलीचा फोन सोफ्यावर वाजत असतो. तो फोन बघितल्यावर आशाला समजते कि, रेडिओवर कहाणी सांगणारी ती मुलगी दुसरी-तिसरी कोणीच नसून आपली मुलगी मीरा आहे.

देशात आज कित्येक मुलींवर अत्याचार सुरु आहेत. यातील फार कमी केसेस पोलिसांमध्ये दाखल केल्या जातात. शाळेत “गुड टच, बॅड टच’ शिकवला जातो. परंतु अनेकदा आपला नातेवाईकच असल्याकारणाने पीडित मुलगी याची कुठे वाच्यताही करत नाही. परंतु आपल्या मुलांच्या वागण्या-बोलण्यात फरक जाणवल्यास त्यांना बोलते करावे.

– श्‍वेता शिगवण

What is your reaction?
121 :thumbsup:
60 :heart:
0 :joy:
4 :heart_eyes:
0 :blush:
30 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)