आडवाणी-जोशींचा स्टार प्रचारक यादीतूनही पत्ता कट 

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने स्टार प्रचारक नेत्यांची यादी जाहीर आहे. या यादीत ४० नवे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव टॉपवर आहे. याशिवाय  भाजपा अध्यक्ष अमित शाह, गृहमंत्री राजनाथ सिंह, डॉ. महेंद्र नाथ पांडे्य, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा यांच्या नावाचा समावेश आहे. परंतु, या यादीमध्ये संस्थापक लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.

भाजपाने पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांसाठी आपल्या स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाला सादर केली आहे. विशेष म्हणजे योगी आदित्यनाथ यांचे नाव खाली घसरले आहे. नितिन गडकरी, अरुण जेटली, सुषमा स्‍वराज, रामलाल, थावरचंद्र गहलोत, जेपी नड्डा आणि शिवराज सिंह चौहान यांचीही नावे स्टार प्रचारकाच्या यादीत सामील आहे.

स्टार प्रचारकाच्या यादीत  लालकृष्ण आडवाणी यांचे नाव नसल्याने आडवाणी युगचा अंत होताना दिसत आहे. भारतीय जनता पक्षाची स्थापना झाल्यापासून लालकृष्ण आडवाणी सर्वात मोठे स्टार प्रचारक होते. परंतु, यंदाच्या निवडणुकीत लालकृष्ण आडवाणी याना उमेदवारी देण्यात आली नाहीच. परंतु, त्यांचे नाव स्टार प्रचारक यादीतूनही वगळण्यात आले. निवडणुकीत वृद्ध नेत्यांना अराम देण्यात आला असल्याचा दावा भाजपने केला आहे. मात्र, कलराज मिश्रा यांचे नावाचा यादीत समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)