कर्जमाफीची वेळ पुन्हा न येण्याचे प्रयत्न

केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री जावडेकर यांचे प्रतिपादन


पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा राज्यस्तरीय आरंभ

पुणे – “कर्जमाफीची पुन्हा वेळ येणार नाही अशी परिस्थिती या सरकारने निर्माण केली आहे. त्यासाठी या सरकारने पाणी, खते, शेतीमालाला दर देण्याचे ठरविले आहे. यासोबतच प्रत्येक अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या खात्यात 6 हजार रुपये देण्याचा निर्णय घेऊन ते जमा केले जात आहेत. 28 फेब्रुवारीपर्यंत पहिल्या टप्प्यात 70 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात येतील. त्यानंतर दोन टप्प्यांत प्रत्येकी 2 हजार रूपये जमा होतील, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी येथे दिली.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ कार्यक्रम पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषी व फलोत्पादन मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुहास दिवसे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, कृषी विभागाचे निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे संचालक विजयकुमार इंगळे, विस्तार संचालक विजय घावटे, मृद व जलसंधारण संचालक कैलास मोते, उपसंचालक अनिल बनसोडे, पुणे विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, पुणे विभागाचे अधीक्षक कृषी अधिकारी दादाराम सप्रे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बी. जे. पलघडमल उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जावडेकर म्हणाले, “जोपर्यंत शेतकरी, शेतमजूर उभा राहत नाही, तोपर्यंत ग्रामीण अर्थव्यवस्था मंद गतीने चालत असते. त्याला चालना देण्यासाठी या सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणून सत्यक्रांती केली आहे. शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी देशातील 14 कोटी शेतकरी मृद आरोग्य पत्रिकेचा वापर करत आहेत. युरिया मिळत नसल्याची ओरड पूर्वी होत होती. या सरकारने पाऊले उचलत युरिया निमकोटेड करून उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे विविध कंपन्याकडून होणारी सुमारे 12 हजार कोटींची चोरी थांबली असून तुटवड्याची ओरड बंद झाली आहे.

सावकाराच्या जाचातून सुटका होण्यासाठी शेतकरी कर्जाची तरतूद वाढवून ती 13 लाख कोटी रुपये करण्यात आली आहे. तसेच शेतमालाला दर देण्याच्या प्रश्‍नावर सातत्याने आंदोलने होत होती. म्हणून या स्वामिनाथन आयोगाची शिफारस करण्याची मागणी केली होती, ती आता पूर्ण होत आहे. दरवर्षी ऊसाच्या दरासाठी शेतकऱ्यांना पूर्वी आंदोलन करावे लागले होते. परंतु चार वर्षांपासून सरकारने योग्य पावले उचलल्यामुळे तशी वेळ आली नाही.’
कार्यक्रमात एकनाथ डवले यांनी प्रास्तविक, सुहास दिवसे यांनी आभार मानले.

पुणे जिल्ह्यातील 14 शेतकऱ्यांचा सत्कार
कार्यक्रमप्रसंगी मानव संसाधन विकास विभागाचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते पंतप्रधान किसान योजनेचा लाभ देण्यात आलेले शेतकरी मारूती सणस (सणसनगर), गोविंद आव्हाळे (आव्हाळवाडी), सुदाम आव्हाळे( आव्हाळवाडी), उत्तम सातव (आव्हाळवाडी), गुलाब हरपळे (फुरसुंगी), गजानन यादव (फुरसुंगी), राजेंद्र वाळके (पेरणे), शिवाजी टुले (पेरणे), विठ्ठल गबदुले (किरकटवाडी), संजय करंजावणे (किरकटवाडी), शशिकांत हागवणे(किरकटवाडी),सुनील तागुंदे (खडकवाडी), दिलीप घुले (मांजरी बु),पवन घुले (मांजरी बु) यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)