अवनी वाघिणीच्या बछड्यांचा मृत्यू

चंद्रपूर : अवनी या वाघिणीची ज्या निर्दयी पद्धतीने हत्या करण्यात आली, यामुळे पशुप्रेमींमध्ये दुःखाचे वातावरण निर्माण झाले होते. वाघिणीच्या मृत्यूनंतर बेपत्ता असलेल्या तिच्या दोन बछड्यांच्या शोध वन विभागाचे कर्मचारी घेत होते. यातच  जुनोना-मामला मार्गावर रेल्वेच्या धडकेत वाघिणीच्या दोन बछड्यांचा मृत्यू झाला. दोन्ही बछडे अंदाजे सहा ते आठ महिन्यांचे असून दोन्ही मादी बछडे होते. यापूर्वी देखील अशा दुर्घटनांमध्ये अनेक प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला असला तरीही या मार्गावरील रेल्वेचा वेग कमी झालेली नाही तसेच प्रतिबंधात्मक उपाय  योजले गेले नाहीत. यामुळे  पशुप्रेमींमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, पांढरकवडा वनक्षेत्रपरिसरात अवणी वाघिणीला गोळ्या घालून ठार केल्यानंतर तिच्या बछड्याचे दर्शन झाले नव्हते. तसेच वाघिणीने केलेल्या शिकारीवर, दुधावर बछड्याचे पोट भरत असते. वाघिणीच्या मृत्यूनंतर बछडे देखील उपाशी पाठोपाठ मृत्यू पावतील की काय, अशी भीती व्यक्त केली गेली होती.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)