ऍथलेटिक्‍स अजिंक्‍यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या अविनाश साबळेचा राष्ट्रीय विक्रम

पतियाळा – येथे सुरू असलेल्या फेडरेशन चषक वरिष्ठ ऍथलेटिक्‍स अजिंक्‍यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने सोमवारचा दिवस गाजवला. त्याने पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. यावेळी त्याने 8 मिनिटे 28.94 सेकंदाच्या वेळेची नोंद करताना स्वतःच्याच नावावर असलेला राष्ट्रीय विक्रम मोडला आणि चीनमध्ये होणाऱ्या आशियाई अजिंक्‍यपद ऍथलेटिक्‍स स्पर्धेची पात्रता निश्‍चित केली.

त्याच्यासह 1500 मीटर शर्यतीत जिन्सन जॉन्सन, अजय कुमार सरोज आणि राहुल यांनी आशियाई स्पर्धेचे तिकीट पटकावले. अविनाशने गतवर्षी 8 मिनिटे 28.94 सेकंदाची वेळ नोंदवताना 37 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला होता. त्याने 1981 मध्ये गोपाळ सैनी यांचा 8 मिनिटे 29.80 सेकंदाचा विक्रम मोडला होता.

एका वर्षातच अविनाशने स्वतःच्या नावावर असलेला विक्रम सोमवारी मोडला. 1500 मीटर शर्यतीत जिन्सन जॉन्सनने 3 मिनिटे 41.67 सेकंदाची वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले. अजय कुमार सरोज ( 3:43.57) आणि राहुल ( 3:44.94) यांनीही आशियाई स्पर्धेसाठीच्या 3:46.00 सेकंदाची पात्रता वेळ पार केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)