“ऍव्हेंजर्स एंडगेम’ सर्वधिक कालावधीचा सिनेमा

मार्वेलचा आगामी “ऍव्हेंजर्स एंडगेम’ पुढच्या महिन्यात रिलीज होणार आहे. हा मार्वेलचा आतापर्यंतचा सर्वाधिक लांबीचा सिनेमा असणार आहे. त्याचा कालावधी तब्बल 3 तास 2 मिनिटे असणार आहे. मार्वेलच्या यापूर्वीच्या “ऍव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर’चा कालावधी 2 तास 40 मिनिटे होता. मार्वेलच्या आतापर्यंत सर्वाधिक कालावधीच्या सिनेमाचे रेकॉर्ड “इन्फिनिटी वॉर’च्या नावे होते. ते आता तोडले जाणार आहे. मार्वेलचे प्रमुख केविन फीजनी एका एन्टरटेनमेंट वेबसाईटशी बोलताना ही माहिती दिली.

“ऍव्हेंजर्स एंडगेम’चा कालावधी इतका जास्त असल्याबद्दल त्याला काहीही गैर वाटत नाही आहे. हा कालावधी एवढ्या चांगल्या सिनेमसाठी योग्यच आहे. इंग्लिश सिनेमे बहुतेक 1 तास 45 मिनिटांपासून जेमतेम 2 तासांचे असतात. मात्र “ऍव्हेंजर्स एंडगेम’मध्ये मार्वेलच्या 22 सिनेमांमधील सर्व सुपरहिरो एकत्र येणार आहेत. सर्व सुपरहिरो एकत्र असले तरी व्हिलनमात्र थॅनोज हाच असणार आहे. तसेच मार्वेलच्य सर्व सिनेमांचा क्‍लायमॅक्‍स “ऍव्हेंजर्स एंडगेम’मध्ये बघायला मिळणार आहे. आता एवढ्या मोठ्या स्टारकास्ट आणि मोठ्या कथेचा पसारा असल्यावर सिनेमाचा कालावधी वाढणार, हे स्वाभाविकच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)