नियोजन न करता अवनीवर हल्ला

एनटीसीए’च्या अहवालात ठपका

नागपूर: नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथोरिटीने अवनी वाघिणीच्या शिकारीबाबतचा सर्वेक्षण अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार कोणतेही नियोजन न करता अवनीवर हल्ला करण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले आहे. अवनी वाघिणीला ठार केले त्या दिवशी यवतमाळच्या जंगलात वाघिणीला पकडण्यासाठी आलेल्या टीमने व्हेटरनरी टीमसोबत नीट समन्वय राखला नव्हता, असे स्पष्ट झाले आहे.

अवनीला बेशुद्ध करण्यासाठी डॉ. कडू यांनी दिलेला डार्ट (बेशुद्ध करण्याचे इंजेक्‍शन) 24 तासांच्या आत वापरणे बंधनकारक होते. परंतु मुखबीर शेख यांनी तो डार्ट तब्बल 56 तासांनी वापरला. त्यामुळे अवनी बेशुद्ध झाली नाही. परिणामी अवनीला ठार मारावे लागले, असा अहवाल नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथोरिटीने (एनटीसीए) दिला आहे.
अवनीची शिकार केली त्या दिवशी तिला मारण्यापूर्वी ती अनेकदा दिसली होती.

त्यामुळे अवनीला पकडण्यासाठी योग्य नियोजन करणे शक्‍य होते. परंतु कोणतेही नियोजन न करता अवनीवर हल्ला करण्यात आला. अवनीला ठार केले त्या टीममध्ये व्हेटरनरी डॉक्‍टर, बायोलॉजिस्ट असे कुणीही नव्हते, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)