एमपीएससीचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध

पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत येत्या दि. 24 मार्च रोजी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब पूर्व परीक्षा होत आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची प्रवेशपत्रे आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर प्रोफाईलद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. प्रवेशपत्र परीक्षेपूर्वी डाऊनलोड करून घेणे व प्रत्यक्ष परीक्षेच्यावेळी सादर करणे आवश्‍यक आहे, असे आयोगाकडून गुरुवारी स्पष्ट करण्यात आले.

परीक्षेच्या वेळी प्रवेशपत्र सक्‍तीचे आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही. प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहाणे अनिवार्य आहे. तसेच, प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वत:च्या बैठक क्रमांकावर उपलब्ध राहाणे आवश्‍यक आहे. परीक्षेला येताना उमेदवाराने ओळखीच्या पुराव्यासाठी एक मूळ ओळखपत्र असणे महत्त्वाचे आहे, अशी माहिती आयोगाकडून देण्यात आली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)