कृषी पदवीच्या दुसऱ्या फेरीसाठी 10 हजार 500 जागा उपलब्ध

कृषी पदवीच्या पहिल्या ऑनलाईन फेरीत 2 हजार प्रवेश निश्‍चित
दुसऱ्या फेरीसाठी 10 हजार 500 जागा उपलब्ध
पुणे – राज्यातील कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या ऑनलाईन प्रवेश फेरीत केवळ 2 हजार 179 विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्‍चित केले आहेत. त्यामुळे दुसऱ्या फेरीसाठी सुमारे 10 हजार 500 जागा उपलब्ध झाल्या आहेत. या फेरीची गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात आली असून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी दि. 6 ऑगस्टपर्यंत मुदत आहे.

राज्यातील चार कृषी विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयांमधील सात पदवी अभ्यासक्रमांमध्ये एकुण 14 हजार 557 प्रवेश क्षमता आहे. त्यासाठी सुमारे 64 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. यावर्षी पहिल्यांदाच कृषी पदवीसाठी सीईटी घेण्यात आली. त्यानुसार केंद्रीय पध्दतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून गुरूवारी पहिल्यी प्रवेश फेरी पुर्ण झाली. कृषी प्रवेशाची पहिली फेरीनंतर दुसरी गुणवत्ता यादी नुकतीच प्रसिध्द झाली. या यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी दि. 6 ऑगस्टपर्यंत संबंधित महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागेल. त्यानंतर दि. 7 ऑगस्टला तिसऱ्या फेरीसाठी रिक्‍त जागा प्रसिध्द केल्या जातील. तर तिसरी गुणवत्ता यादी दि. 9 ऑगस्टला प्रसिद्ध होणार असल्याचे राज्य सीईटी सेलने कळविले आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)