अवधूत वाघ यांचा डीएनए पाकिस्तानचा असावा, ते बेवारस असावेत – बच्चू कडू

यवतमाळ – भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी वादग्रस्त ट्विट केले होते. यामध्ये  त्यांनी आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्याची मुले अनाथ म्हणजे लावारिस असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या ट्विट वर आमदार बच्चू कडू यांनी टीका केली असून अवधूत वाघ यांचा डीएनए बहुधा पाकिस्तानचा असावा, ते बेवारस असावेत असे वक्तव्य केले आहे.

भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी केलेल्या ट्विट नंतर अनेक जणांनी यावर टीका केली आहे. अवधूत वाघ यांच्या या ट्विट वर बोलताना आमदार कडू म्हणाले, अवधूत वाघ यांचा डीएनए तपासून बघितला पाहिजे, त्यांचा डीएनए बहुधा पाकिस्तानचा असावा. अवधूत वाघला शेतकऱ्यांचे दुःख आणि वेदना समजत नाही वाटत, भाजपच्या आणि काँग्रेसच्या  चुकीच्या धोरणांमुळेच शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागत आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा जाब विचारू, असे  बच्चू कडू म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)