न्यूझीलंडमध्ये स्वयंचलित रायफल्सवर बंदी 

वेलिंग्टन – न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्च येथील मशिदीवर झालेल्या गोळीबाराच्या दुर्घटनेत 49 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या देशात शस्त्रांवर बंदी घालण्याची मागणी होत होती. त्यानुसार, पंतप्रधान जेसिंडा अर्डन यांनी सेमी ऑटोमॅटिक रायफलींच्या विक्रीवर बंदीची घोषणा केली आहे.

अर्डन म्हणाल्या, आम्ही सर्व सेमी ऑटोमॅटिक रायफल, उच्च क्षमतेच्या मॅगझिन्स आणि त्यांच्या पार्टसवर प्रतिबंध घालत आहोत. ज्यामुळे कोणतेही हत्यार अधिक जास्त घातक बनवले जाऊ नये. हा हल्ला घडवून आणणाऱ्या व्यक्तीचा जन्म ऑस्ट्रेलियात झाला आहे. त्याने गुरुवारी रात्री आपल्या फेसबूक पोस्टच्या माध्यमातून या हल्ल्याची माहिती दिली होती. आपल्या कटाची माहिती त्याने 37 पानांच्या एका जाहिरनाम्याद्वारे प्रसिद्ध केली होती. या जाहिरनाम्याला त्याने “द ग्रेट रिप्लेसमेंट’ असे नाव दिले होते.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन म्हणाले, न्यूझीलंडच्या कैदेत असलेली ती व्यक्ती ऑस्ट्रेलियाची नागरिक आहे. ती व्यक्ती उजव्या कट्टरवादी विचारसरणीची दहशतवादी आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलिया सरकारने याप्रकरणी चौकशीसाठी न्यूझिलंडला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. या हल्ल्याच्या व्हिडिओत दिसत असलेली व्यक्ती लाईव्ह प्रसारणात हेल्मेटवरील कॅमेऱ्याचा वापर केला होता. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ फेसबुकवर प्रसारीत झाला आहे. यामध्ये लोकांना निवडून त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. हल्लेखोराने आपल्या कारमधून जात मशिदीवर हल्ला करुन तिथून बाहेर पडतानाचा संपूर्ण व्हिडिओ प्रसारित केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)