#AusvInd : पूजाराचे शतक, भारत पहिल्याच दिवशी भक्कम स्थितीत

सिडनी – चेतेश्वर पुजाराच्या नाबाद शतकी आणि मयंक अग्रवालच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर भारताने पहिल्या दिवसअखेर 4 बाद 303 धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे भारतीय संघाने कसोटी मालिकेतील अखेरच्या आणि चौथ्या कसोटीत पहिल्या दिवशी आपले वर्चस्व गाजवले आहे. भारताने या मालिकेत तिसरा कसोटी सामना जिंकून 2-1 अशी आघाडी घेतली आहे. अखेरचा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याचा भारताचा प्रयत्न असणार आहे.

दरम्यान भारतीय कर्णधार कोहलीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा सलामीवीर लोकेश राहुल हा पुन्हा एकदा अपयशी ठरला. राहुल 9 धावांवर बाद झाला. तर मयंक अग्रवाल 77 धावा काढून बाद झाला. त्यानंतर आलेल्या विराटा कोहली आणि अंजिक्य रहाणे हे सुध्दा चांगली कामगिरी करू शकले नाही. विराट 23 आणि रहाणे 18 धावांवर बाद झाला. तर चेतेश्वर पूजाराने कसोटी क्रिकेटमधील 18 वे शतक पूर्ण करत भारताला मजबूत स्थितीत पोहचविले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ऑस्ट्रेलियाकडून जोश हेजलवूडने 2 तर नाथन लायनआणि मिचेल स्टार्कने प्रत्येकी 1 गडी बाद केला. आज पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा चेतेश्वर पूजारा नाबाद 130 आणि हनुमा विहारी हा 39 धावांवर खेळत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)