#AusvInd 2nd T20 : डकवर्थ लुईस नियमानुसार भारतासमोर 137 धावांचे आव्हान

मेलबर्न – भारत वि आॅस्ट्रेलिया याच्यांतील तीन टी20 क्रिकेट मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर सुरू झाला आहे. मात्र 19 व्या षटकानंतर सुरू झालेल्या पावसामुळे खेळ थांबविण्यात आला आहे. प्रथम फलंदाजी करताना पावसामुळे खेळ थांबला तेव्हा आॅस्ट्रेलियाने 19 षटकात 7 बाद 132 धावा केल्या होत्या. त्यानंतर आता डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला 19 षटकांत 137 धावांचे लक्ष्य देण्यात आले आहे.

दरम्यान, आॅस्ट्रेलियाचा सलामीवीर अॅरोन फिंच हा शून्यावर तर दूसरा सलामीवीर डार्सी शाॅर्ट हा 14 धावा काढून बाद झाला. भारताकडून गोलंदाजीत खलील अहमद याने 4 षटकांत 39 धावा देत 2 गडी बाद केले. तर भुवेनश्वर कुमार याने सुध्दा 3 षटकात 20 धावा देत 2 गडी बाद केले आहेत. कुलदीप यादव आणि क्रुणाल पांड्या यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)