वॉर्नरला पुन्हा संधी मिळेल – रॉबर्टस

मेलबर्न – चेंडू छेडछाड प्रकरणी स्टिव्हन स्मिथ आणि कॅमरॉन बॅंक्रॉफ्ट यांनी डेव्हिड वॉर्नर संबंधी केलेल्या नवीन खुलाश्‍यांचा परिणाम डेव्हिड वॉर्नरच्या पुनरागमनावर होणार नसल्याचे वक्तव्य ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाचे मुख्याधिकारी केविन रॉबर्टस यांनी एका संकेतस्थळाशी बोलताना केले असून त्याला पुनरागमनाची संधी मिळेल असे सांगितले.

चेंडू छेडछाड प्रकरणानंतर स्मिथ आणि बॅंक्रॉफ्ट यांनी काही दिवसांपूर्वी मुलाखती दिल्या होत्या आणि त्यात त्यांनी डेव्हिड वॉर्नर चेंडू छेडछाड प्रकरणी मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले होते. पण स्मिथ आणि बॅंक्रॉफ्ट यांनी स्वतःच्या चुकाही मान्य केल्या होत्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्मिथ मुलाखतीत म्हणाला होता की, जेव्हा मला वॉर्नरने सांगितले की कसोटी सामना जिंकण्यासाठी आपणाला चेंडूंमध्ये छेडछाड करावी लागेल. तेव्हा मला त्याबाबत जाणूनही घेण्यात रस नव्हता. या सर्व बाबींवर बोलताना ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाचे मुख्य अधिकारी रॉबर्टस म्हणाले, बॅंक्रॉफ्ट आणि स्मिथ यांनी जे सांगितले ते आता महत्त्वाचे नाही. ज्यावेळी हे प्रकरण झाले होते त्यावेळी आम्ही याचा तपास करून खेळाडूंवर बंदी घातली होती.

तिन्ही खेळाडूंची क्रिकेटबंदी संपल्यावर आम्ही पुन्हा त्यांच्याशी करार करण्यास उत्सुक असून काही दिवसांपूर्वीच मी वॉर्नरसह खाजगीत बोललो आहे. तो पुन्हा संघात येण्यास उत्सुक आहे. खरे सांगायचे झाले तर त्या सर्वांचा हेतू ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देणे इतकाच होता. परंतु, त्यासाठी त्यांनी जो मार्ग अवलंबला तो चुकीचा होता. आम्ही त्यांना शिक्षा केली आणि क्रिकेटबंदीची शिक्षा संपल्यावर वर त्यांना पुन्हा खेळाडू म्हणून सन्मानाने खेळण्याची मुभा आहे.

ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू मिचेल स्लाटर यांनी वॉर्नरवर टीका करताना म्हटले होते की, चेंडू छेडछाड प्रकरणातील अन्य दोन दोषी खेळाडूंनी वॉर्नरला मुख्य सूत्रदार घोषित केल्याने वॉर्नरचे पुनरागमन धोक्‍यात आले आहे. या वादात रिकी पॉन्टिंगने उडी घेत वॉर्नरची पाठराखण केली होती. तर ऑस्ट्रेलियाच्या संघातील खेळाडू ऍरॉन फिंचनेदेखील याबाबत आपले मत दिले आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलिया या संकेतस्थळाशी बोलताना तो म्हणाला, जेव्हा वॉर्नर आणि स्मिथ यांना जेव्हा क्रिकेट मंडळाकडून खेळण्यासाठी परवानगी मिळेल तेव्हा संघात त्यांचे स्वागतच होईल. जे झाले ते झाले. त्याचा आता विचार करून काही उपयोग नाही. त्यांची शिक्षा संपत आली आहे. त्यामुळे ते पुन्हा मैदानात येण्यासाठी कसून सराव करत आहेत. त्याच्या सरावातून ते पुन्हा आंतरराष्टीय क्रिकेट खेळ्यासाठी खूप उत्सुक दिसत आहेत. आम्ही ड्रेसींग रूममध्ये देखील याबाबत चर्चा करत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)