#AUSvSA : आॅस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी विजय

एडिलेड : आॅस्ट्रेलिया विरूध्द दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आॅस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी विजय मिळविला आहे. आजच्या या विजयाबरोबरच तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत आॅस्ट्रेलियानी 1-1 अशी बरोबरी साधली आहे.

तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आॅस्ट्रेलियाच्या संघाने 48.3 षटकात सर्वबाद 231 धावा केल्या. आॅस्ट्रेलियन फलंदाजीत एलेक्स कैरीने 47, क्रिस लिनने 44, आरोन फिंचने  41 तर शाॅन मार्श आणि एडम जम्पा यांनी प्रत्येकी 22 धावा केल्या. आफ्रिकेकडून कगिसो रबाडा याने सर्वाधिक 4, डवायन प्रीटोरियसने 3, डेल स्टेनने 2 तर लुंगी एनगिडी याने 1 गडी बाद करत आॅस्टेलिया संघास 231 धावांवर रोखले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विजयसाठी 232 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघास 50 षटकांत 9 बाद 224 धावांच काढता आल्याने त्यांना 7 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. आफ्रिकेकडून डेविड मिलरने सर्वाधिक 51 तर फाफ जू प्लेसीने 47 धावा काढल्या, इतर फलंदाज मात्र मोठी धावसंख्या उभारण्यास अपयशी ठरले. आॅस्ट्रेलियाच्या गोलंदाजीत मार्कस स्टोइनिसने 3, मिचेल स्टार्क आणि जोश हेजलवुडने प्रत्येकी 2 तर पैट कमिन्स याने 1 गडी बाद करत संघाच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावली. आरोन फिंच याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

आॅस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना रविवारी (11 नोव्हेंबर) बेल्लरिव अोवल मैदानावर 8.20 वाजता होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)