सिडनी – अव्वल कामगिरीची अपेक्षा असलेले समीर वर्मा, पारुपल्ली कश्यप व पी.व्ही.सिंधू यांना पराभव स्वीकारावा लागला, त्यामुळेच ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील भारताचे आव्हानही संपुष्टात आले.
सिंधू हिला निचापोन जिंदापोल हिने 21-19, 21-18 असे पराभूत केले. समीर याला चीन तैपेइ संघाच्या वॉंग तिझु वेइ याने 21-16, 7-21, 21-13 असे हरविले. समीर याने दुसऱ्या गेममध्ये चिवट झुंज दिली मात्र तिसऱ्या गेममध्ये त्याचा निभाव लागला नाही. माजी ऑलिंपिक विजेता लिन दान याने कश्यप याच्यावर 21-17, 20-22, 21-14 अशी मात केली.