#CWC19 : चेंडू कुरतडल्याची घटना इतिहासजमा – लॅंगर

मॅंचेस्टर – साखळी गटात अग्रस्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाची आज येथे दक्षिण आफ्रिकेविरूद्ध लढत होत असून त्यामध्ये कांगारूंचे पारडे जड राहील असा अंदाज आहे. ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नर यांना येथील कटू आठवणी पुसण्याची संधी आहे.

दरम्यान, चेंडू कुरतडल्याची घटनेविषयी ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लॅंगर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, आमच्या खेळाडूंकडून चेंडू कुरतडल्याची लाजिरवाणी घटना घडली होती. त्याबद्दल स्मिथ व वॉर्नर यांना शिक्षाही झाली होती. अशा घटना पुन्हा पुन्हा उकरून काढण्यांत काही जणांना स्वारस्य वाटत असेल. मात्र, आमच्यासाठी ही घटना इतिहासजमा झाली आहे. येथे आम्ही विजेतेपद टिकवण्यासाठीच आलो आहोत. आजचा सामना जिंकून अग्रस्थान राखण्यासाठी आमचे खेळाडू उत्सुक झाले आहेत, असे ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लॅंगर यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here