फिंचला संघातून वगळा : स्टीव्ह वॉ

मेलबर्न – ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह वॉ याने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत खराब कामगिरी करणाऱ्या ऍरॉन फिंचला संघातून वगळण्याचा सल्ला ऑस्ट्रेलिया संघव्यवस्थापनाला दिला आहे. त्याच्या या विधानावर अन्य माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगदेखील सहमत आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेतील शेवटचा कसोटी सामना आजपासून सिडनी मैदानावर खेळवला जाणार आहे. या मैदानाची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना पूरक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे स्टिव्ह वॉने सुचवले की, फिंचला वगळून फिरकी गोलंदाज मर्नास लॅबसचेंज याला संघात स्थान द्यावे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सलामीचा प्रश्‍न सोडवण्यासाठी मार्कस हॅरिस आणि शॉन मार्शने सलामीला यावे तर या मालिकेत ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या ट्रेव्हिस हेडने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी. तर गोलंदाजी विभागाबाबत बोलताना वॉ म्हणाला, ऑस्ट्रेलियन गोलंदाज चांगली कामगिरी करत असून पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन लायन आणि हेजलवूड यांनी गोलंदाजीची धुरा सांभाळावी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)