#IndvAus 1st T20I :  भारताचे ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 127 धावांचे आव्हान

विशाखापट्टणम – लोकेश राहुलच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या टी-20 क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 127 धावांचे आव्हान ठेवले आहे.

तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 7 बाद 126 धावसंख्या उभारली. सलामीवीर रोहित शर्मा अवघ्या 5 धावावर बाद झाला. त्यानंतर लोकेश राहुल आणि विराट कोहलीने भारताचा डाव सावरला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लोकेश राहुलने 36 चेंडूत 50 आणि विराटने 17 चेंडूत 24 धावा केल्या. त्यानंतर भारताचा एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. यष्टीरक्षक एम.एस. धोनीने 37 चेंडूत 29 धावा केल्या.

https://twitter.com/BCCI/status/1099686372070354944

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)