ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डी आर्सी शॉर्टला फिरकीचा ‘सहारा’

मेलबर्न – ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डी आर्सी शॉर्ट ऑस्ट्रेलियाच्या संघातील आपले स्थान निश्‍चित व्हावे यासाठी स्वतःच्या खेळात सुधारणा करत असून तो मागील काही महिन्यांपासून भारताचे माजी फिरकीपटू श्रीधरन श्रीराम यांच्या मार्गदर्शनाखाली फिरकीचे धडे घेत आहे. भारताविरुद्ध होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी त्याची ऑस्ट्रेलियाच्या 15 सदस्यीय संघात निवड झालेली आहे.

याबाबत बोलताना शॉर्ट म्हणाला, माझे गोलंदाजी कौशल्य वाढावे म्हणून मी मागील काही महिन्यांत श्रीराम यांच्यासह काम केले आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या अ संघाच्या मालिकेत त्यांनी मला मार्गदर्शन केले होते. तर मी मागील दोन दिवसातही त्यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला आहे. ज्यामुळे माझ्यात थोडी सुधारणा झाली असून संघाला गरज पडल्यास काही षटके गोलंदाजी करू शकणार असल्याचा आत्मविश्वास वाढला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यंदाच्या “बिग बॅश टी -20 लीग’ मध्ये शॉर्टने हॉबर्ट हरिकेनसाठी 15 सामन्यांत गोलंदाजी करताना 10 बळी घेतले आहेत. तर 53. 08 च्या सरासरीने 637 धावाही केल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)