#ICCWorldCup2019 : फलंदाजीच्या क्रमवारीत बदल शक्‍य -पॉंन्टिग

टॉंटन – पाकिस्तानकडे प्रभावी वेगवान व अनुभवी फिरकी गोलंदाज आहेत. त्यामुळेच सामन्यातील परिस्थितीनुसार फलंदाजांच्या क्रमवारीत बदल केला जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही असे ऑस्ट्रेलियाचे सहाय्यक प्रशिक्षक रिकी पॉंन्टिग यांनी सांगितले.

पॉंन्टिग पुढे म्हणाले की, डावखुरा व उजव्या हाताने खेळणारा फलंदाज अशी आमची आवडती व्यूहरचना असते. भारताविरूध्दच्या लढतीत आम्ही उस्मान ख्वाजाच्या जागी स्टीव्ह स्मिथ याला बढती दिली होती. आजही असा प्रयोग केला जाण्याची शक्‍यता आहे. भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या महत्वपूर्ण षटकांमध्ये आमच्या फलंदाजांना रोखून धरले हे मला मान्यच करावे लागेल. षटकामागे सात ते आठ धावांचा वेग ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहील. ऍरोन फिंच व डेव्हिड वॉर्नर ही सर्वोत्तम सलामीची जोडी आहे. त्यामुळे त्यांच्या क्रमवारीत बदल होण्याची शक्‍यता कमी आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)