महिला टी20 वर्ल्ड कप : आॅस्ट्रेलिया चौथ्यांदा विश्वचॅम्पियन

गयाना : महिला टी20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडवर मात करून आॅस्ट्रेलियाने चौथ्यांदा विश्वचषक पटकावला आहे. अष्टपैलू खेळाडू अॅश्ले गार्डनरच्या कामगिरीच्या बळावर आॅस्ट्रेलियाने इंग्लंडवर आठ विकेटने विजय मिळवित विश्वचषक आपल्या नावे केला.

इंग्लंड महिला संघाची कर्णधार हेदर नाइट हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या संघाने 19.4 षटकांत सर्वबाद 105 धावा केल्या. संघाकडून डॅनियल हिने सर्वाधिक 43 धावा केल्या.

-Ads-

विजयासाठीचे 106 धावांचे आव्हान आॅस्ट्रेलियाने सहज पूर्ण केले. आॅस्ट्रेलियाने 15.1 षटकात 2 विकेट गमावत 106 धावा करत अंतिम सामन्यात विजय संपादित करत स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. ऑस्ट्रेलियाकडून अॅश्ले गार्डनर 33 आणि मेग लॅनिंग 28 यांनी 62 धावांची नाबाद भागिदारी करत संघाला विजय मिळवून दिला.

आॅस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू अॅश्ले गार्डनर हिला प्लेयर आॅफ द मॅच म्हणून गौरविण्यात आले. तर आॅस्ट्रेलियाची यष्टीरक्षक एलिसा हिला प्लेयर आॅफ द टूर्नामेंट म्हणून गौरविण्यात आले. एलिसाने स्पर्धेत सर्वाधिक 225 धावा तसेच चार यष्टीचित आणि चार झेलबाद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)