#AUSvSL : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 323 वर आटोपला, श्रीलंका पराभवाच्या छायेत

पुणे – ब्रिसबेन येथील ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या पहिला कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात 1 बाद 17 धावा झाल्या आहेत. डावाने पराभव टाळण्यासाठी श्रीलंकेला अजूनही 162 धावांनी आवश्यकता आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा खेळपट्टीवर लाहिरू थिरिमाने हा 6 धावांवर खेळत आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 323 वर आटोपला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कालच्या 2 बाद 72 वरून पुढे खेळताना ऑस्ट्रेलियाचा मार्कस हॅरिस (44) आणि नाईट वाॅचमन नाथन लायन 1 धावा काढून बाद झाला. यावेळी ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ही 4 बाद 82 होती. यानंतर लैबुशैन आणि ट्रेविस हेड यांनी पाचव्या विकेटसाठी 166 धावांची भागिदारी केली. लैबुशैनने 82 आणइ हेडने 84 धावा करत ऑस्ट्रेलियाला मोठी आघाडी मिळवून दिली. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेवर 179 धावांची आघाडी घेतली. श्रीलंकेकडून सुरंगा लकमलने 5 आणि दिलरूवान परेराने 2 विकेट घेतल्या.

दुसऱ्या डावात श्रीलंका फलंदाजी करण्यास उतरली, तेव्हा श्रीलंकेचा सलामीवीर दिमुथ करूणारत्ने हा केवळ 3 धावा काढून बाद झाला. यावेळी श्रीलंकेची धावसंख्या 17 होती, आणि तेव्हा खेळ थांबविण्यात आला. पहिल्या डावात श्रीलंकेचा संघ केवळ 144 धावांत आटोपला होता. ऑस्ट्रेलियाकडून पैट कमिन्सने 4 आणि झाय रिचर्डसनने 3 विकेट घेतल्या. श्रीलंकेकडून निरोशन डिकवेलाने सर्वाधिक 64 धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक –

श्रीलंका : पहिला डाव सर्वबाद 144 आणि दुसरा डाव 1 बाद 17.
श्रीलंका 162 धावांनी पिछाडीवर.

ऑस्ट्रेलिया : पहिला डाव सर्वबाद 323.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)