U19 National Championships : आॅस्ट्रेलियाच्या ‘या’ खेळाडूने एका षटकात मारले 6 षटकार

एडिलेड – आॅस्ट्रेलियाच्या 19 वर्षाखालील संघातील खेळाडू ओली डेविस याने एडिलेडमध्ये राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत एका षटकात 6 षटकार मारत विक्रम रचला आहे. सिडनीच्या या युवा फलंदाजाने दमदार खेळी करताना द्विशतक देखील मारले आहे.

सिडनीच्या या युवा फलंदाजाची साऱ्या क्रिकेट जगतामध्ये त्याने केलेल्या फलंदाजीची आणि एका षटकात मारलेल्या सहा षटकांराची चर्चा होत आहे.

न्यू साउथ वेल्स मेट्रो संघाचे नेतृत्व करताना डेविने केवळ 115 चेंडूत 207 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान षटकाराचा पाऊस पडत होता. एक-दोन नाही तर अोली डेविसने नाॅरदर्न टैरिटरी विरूध्द 17 षटकार मारले. अोली डेविसने पहिले शतक 74 चेंडूत पूर्ण केले मात्र दुसरे शतक केवळ 39 चेंडूत पूर्ण केले.

डेविस अोलीने 40 व्या षटकात प्रतिस्पर्धी संघाचा फिरकीपटू गोलंदाज जॅक जेम्स याच्या गोलंदाजी दरम्यान सहा षटकार लगावत विक्रमाची नोंद केली. अशाप्रकारे 19-वर्षाखालील स्पर्धेत असा विक्रम करणारा डेविस अोली हा पहिला क्रिकेट खेळाडू ठरला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)