#AusvInd : रोहित शर्माचे शतक व्यर्थ, भारताचा 34 धावांनी पराभव

सिडनी – रोहित शर्माच्या दमदार शतकी खेळीनंतरही सिडनी येथील ऑस्ट्रेलिया विरूध्दच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ऑस्ट्रेलियाने भारताचा 34 धावांनी पराभव करत विजय संपादित केला. रोहित शर्माने आजच्या सामन्यात 22 वे आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले, पण तो भारताला विजय मिळवून देण्यास अपयशी ठरला. ऑस्ट्रेलिया संघाचा हा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील 1000 वा विजय ठरला. आजच्या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्याच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पीटर हैडसकाॅब्म, उस्मान ख्वाजा आणि शाॅन मार्श यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतासमोर 289 धावांचे आव्हान उभारले. ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत 5 बाद 288 धावा केल्या.

विजयासाठी 289 धावांचा पाठलाग करताना भारताची खराब सुरूवात झाली. भारताचे सुरूवातीचे 3 फलंदाज केवळ 4 धावांत माघारी परतले. सलामीवीर धवन 0, कोहली 3 आणि अंबाति रायुडू 0 धावांवर बाद झाले. त्यानंतर धोनी आणि रोहितने भारताचा डाव सावरला आणि धावसंख्या शंभरीपार पोहचवली. त्यानंतर धोनी 51, दिनेश कार्तिक 12 जडेजा 8 धावांवर बाद झाले. त्यानंतर रोहित शर्मा 133 धावांवर बाद होताच भारताच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या.

ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत झाये रिचर्डसन याने सर्वाधिक 4 गडी बाद केले. तर जेसन बेहरनडोर्फ, मार्कस स्टोइनिस यांनी प्रत्येकी 2 आणि पीटर सिडलने 1 गडी बाद केला. भारताला 50 षटकांत 9 बाद 254 धावांपर्यतच मजल मारता आली आणि अखेर 34 धावांनी पराभव झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)