#WIvAUS #WT20 : वेस्ट इंडिजला नमवून आॅस्ट्रेलिया महिला संघ अंतिम फेरीत

अॅटिग्वा – आयसीसी टी20 महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत गतविजेत्या वेस्ट इंडिंज संघास आॅस्ट्रेलिया महिला संघाने 71 धावांनी पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. आॅस्ट्रेलिया महिला संघाने सलग पाचव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

दरम्यान वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आॅस्ट्रेलिया महिला संघाने अॅशली हिली हिच्या 46 आणि मेग लॅनिंग हिच्या 31 धावांच्या जोरावर 20 षटकांत 5 बाद 142 धावांपर्यत मजल मारली.

-Ads-

विजयसाठी 143 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघ आॅस्ट्रेलियाच्या गोलंदाजीपुढे पूर्णपणे गडगडला.  वेस्ट इंडिज संघ 17.3 षटकात सर्वबाद 71 धावांच करू शकला. त्यामुळे त्यांना 71 धावांनी पराभव स्विकारावा लागला. वेस्टइंडिज  कर्णधार स्टेफनी टेलर हिने सर्वाधिक 16 धावा केल्या. इतर कोणतीही फलंदाज दुहेरी धावसंख्या उभारू शकली नाही.

आॅस्ट्रेलियाची यष्टीरक्षक हिली हिने 46 धावा करत संघाच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावली. तिच्या या कामगिरीमुळे तिला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)