#AUSvIND : भारतीय संघ आमच्यापेक्षा सरस होता – टिम पेन

सिडनी : ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनने भारताविरुद्ध कसोटी मालिकेत पराभव मान्य केला असून संपूर्ण मालिकेत भारतीय संघ आमच्यापेक्षा सरस कामगिरी करत होता, त्यातल्या त्यात शेवटच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाने ज्या पद्धतीने खेळ केला त्यामुळे आम्ही संपुर्णपणे दबावात आलो होतो. त्यामुळे आम्ही बॅकफूटवर ढकललो गेलो. भारतीय संघ विजयाचा प्रबळ दावेदार होता असेही टीम पेन सामन्यानंतर बोलताना म्हणाला.

परदेशात जाऊन कसोटी सामने जिंकणे किती कठीण काम असते याची मला कल्पना आहे. त्यामुळे भारतीय संघाने केलेल्या या कामगिरीचे नक्कीच कौतुक करायला हवे असेही तो म्हणाला. या विजयासाठी भारतीय संघाने घेतलेली मेहनत पूर्णपणे मैदानामध्ये दिसून आली. असेही टीम पेन सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
8 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)