लंडन – शतकी सलामीनंतर श्रीलंकेच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी हाराकिरी केली, त्यामुळेच त्यांना ऑस्ट्रेलियाकडून 87 धावांनी पराभव पत्करावा लागला. विजयासाठी 335 धावांचा पाठलाग करताना त्यांचा डाव 45.5 षटकात 247 धावांवर आटोपला.
Australia win by 87 runs!
It was all going so well for Sri Lanka before a late innings collapse saw Australia seal their fourth win of #CWC19. pic.twitter.com/ACKTeee6Q2
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) June 15, 2019
कर्णधार दिमुथ करुणारत्ने व कुशल परेरा यांनी सलामीकरिता 115 धावांचा पाया रचला. कुशल याने पाच चौकार व एक षटकारासह 52 धावा केल्या. करुणारत्ने याने संयमपूर्ण खेळ करीत 97 धावा केल्या. त्यामध्ये त्याने नऊ चौकार मारले.
दरम्यान, कर्णधार ऍरोन फिंच याने झंझावती दीडशतक टोलविले, त्यामुळेच ऑस्ट्रेलियास श्रीलंकेपुढे 335 धावांचे लक्ष्य ठेवता आले. स्टीव्ह स्मिथ (73) व ग्लेन मॅक्सवेल (नाबाद 46) यांनी संघास धावांचा डोंगर रचण्यात वाटा उचलला.
पाकिस्तानविरुध्द शतक ठोकणारा डेव्हिड वॉर्नर (26) याच्या साथीत फिंच याने 80 धावांची झकास सलामी केली. फिंच याने 132 चेडूंमध्ये 153 धावा केल्या. त्यामध्ये त्याने 15 चौकार व 5 षटकारांचा समावेश होता. स्मिथ याने 7 चौकार व एक षटकारासह 73 धावा केल्या. मॅक्सवेल याने एका बाजूने शैलीदार खेळ केला. त्याने 5 चौकार व एक षटकारासह नाबाद 46 धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक –
ऑस्ट्रेलिया 50 षटकांत 7 बाद 334 (डेव्हिड वॉर्नर 26, ऍरोन फिंच 153, स्टीव्ह स्मिथ 73, ग्लेन मॅक्सवेल नाबाद 46, इसरू उडाना 2-57, धनंजय डिसिल्व्हा 2-40) श्रीलंका 45.5 षटकात सर्वबाद 247 (दिमुथ करुणारत्ने 97, कुशल परेरा 52, कुशल मेंडीस 30, मिचेल स्टार्क 4-55, पॅट कमिन्स 2-38, केन रिचर्डसन 3-47)